- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवडगाव शिंदे येथील वाघजाई माता मंदिरात शारदीय नवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू

वडगाव शिंदे येथील वाघजाई माता मंदिरात शारदीय नवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरोना च्या दोन वर्षांच्या नंतर यंदाचे वर्षी वडगाव शिंदे, ता. हवेली येथील जागृत शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू असून शारदीय नवरात्रो महोत्सवाच्या निमित्ताने नव दिनात्मक महा नवचंडी याग आयोजित करण्यात आला असल्याचे आनंद आखाडा हरिद्वार, वाघजाई माता सेवा संस्था चे अध्यक्ष महंत गिरीजानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले.


यावेळी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ध्वजपूजन, गौ पूजन यांच्या पूजनाने नवरात्री महोत्सवास सुरुवात करण्यात आली असुन या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये देवी अभिषेक, सप्तशती पाठ व हवन, कुंकुम अर्चम, पूर्णाहुती, सायंकाळी 6 ते 7 श्रीमंत देवी भागवत कथा व नंतर महाआरती या प्रमाणे याठिकाणी रोज कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी फराळा चे वाटप करण्यात येत आहे. यासाठी सर्व नियोजन व व्यवस्थापन श्री वाघजाई माता सेवा संस्था, वडगाव शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.


यावेळी वडगाव शिंदे – काकडे च्या सरपंच हेमलता विलास शिंदे, उपसरपंच उल्का शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शिवानी शिंदे, उषा काकडे, दिपाली शिंदे, योगिता शिंदे, युवराज काकडे, बाळासाहेब शिंदे, अनिल काकडे, उद्योगपती व विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन कल्याण शिंदे, उद्योजक विलास शिंदे, माजी सरपंच विजय शिंदे, ऋषी शिंदे, भरत काकडे, रमेश काकडे, राम काकडे, सुनिल काकडे, बाबुराव काकडे , भिमराव शिंदे, सर्जेराव शिंदे, सतिश शिंदे, तुकाराम शिंदे, माऊली शिंदे, गुलाब शिंदे, कांतिलाल शिंदे, संतोष काकडे, सोमनाथ काकडे, विश्वास काकडे, मच्छिंद्र शिंदे, पप्पू शिंदे, स्वप्निल शिंदे, अजय शिंदे, विशाल शिंदे, सन्मान शिंदे, विजय शिंदे, संभाजी शिंदे, दत्तात्रय शिंदे, सुशील शिंदे, नितीन शिंदे, किरण शिंदे, गणराज शिंदे, वैभव शिंदे, दिपक शिंदे सरकार, समाधान शिंदे, नितीन काकडे तसेच वडगांव शिंदे व परिसरातील ग्रामस्थ यासाठी सेवा देत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page