गजानन गव्हाणे पाटील
फुलगाव, ता. हवेली येथील हरी उध्दव धोत्रे माध्यमिक विद्यालयातील जेष्ठ, आदर्श व कर्तव्यदक्ष शिक्षिका सर्वांच्या प्रेरणास्थान लंका काळूराम भिलारे (वागस्कर लंका ज्ञानोबा) यांना मुख्याध्यापक संघाच्या वतीने जेष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष रतनलाल सोनेग्रा व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्यमान अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या हस्ते कासेगाव इंजिनिअरिंग कॉलेजच्या भव्य हॉलमध्ये “आदर्श व गुणवंत शिक्षिका पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष लोंढे, सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ, तुळापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव सर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रविंद्र पानसरे, कल्याण बरडे, माजी शिक्षक राजाराम कदम, अजित वाघोले, काळूराम भिलारे (आपटी जि.प. शाळा मुख्याध्यापक)आदी उपस्थित होते.

लंका भिलारे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ, संस्थेचे अध्यक्ष संजय धोत्रे, उपाध्यक्ष नारायणराव खुळे व सर्व संचालक गावच्या सरपंच मंदाकिनी साकोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी आदर्श सरपंच सुनील वागस्कर त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.






