गजानन गव्हाणे पाटील
“ शिक्षक दिनाचे ” औचित्य साधून फुलगाव, ता. हवेली येथील हरी उद्धव धोत्रे विद्यालयात “आर्ट ऑफ लिव्हींग” या संस्थेच्या माध्यमातून आय. ए. एच. व्ही. आणि बँक ऑफ न्यूयॉर्क यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयामध्ये १३५ देशी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष लोंढे यांनी दिली.

आर्ट ऑफ लिव्हींगचे निखील पाटील व सुप्रिया पाटील यांच्या सहकार्याने तसेच संतोष गवारे यांच्या विशेष प्रयत्नातून १३५ फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामध्ये ४५ नारळ, ३५ आंबे, १५ चिकू व १० पेरूच्या रोपांचा समावेश आहे. यावेळी आर्ट ऑफ लिव्हींगचे १० स्वयंसेवक आणि बँक ऑफ न्यूयॉर्कचे ७८ स्वयंसेवक उपस्थित होते. या वृक्षारोपणासाठी निखील बगाटे, संतोष धुमाळ, गणेश साळूंके यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव खुळे, माजी उपसरपंच आण्णासाहेब वागस्कर, मुख्याध्यापक सुभाष लोंढे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वृक्षारोपणासाठी एस. बी. इंगवले यांनी विशेष प्रयत्न केले.







