- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवृक्षारोपण करून "ती" ने वाहिली वडिलांना अनोखी आदरांजली

वृक्षारोपण करून “ती” ने वाहिली वडिलांना अनोखी आदरांजली

- Advertisement -spot_img

पुणे : प्रतिनिधी ( सुभाष पाचारणे)
जागतिक कन्यादिन आणि वडिलांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आपल्या दिवंगत वडिलांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण करून अनोखा उपक्रम पुण्यातील आंबेगाव बु! येथील एका कन्येनं केला आहे.


कै. वसंत मारुती साळुंखे, औरंगाबाद (छ.संभाजी नगर) यांची दि.२५ सप्टे.२०२२ रोजी पाचवा स्मृती दिन होता. या दिवशी पारंपरिक पद्धतीला फाटा देत आंबेगाव बु! पुणे येथे रहाणारी त्यांची मुलगी सौ. अनघा अशोक कारंडे हिने आपल्या परिवाराच्या मदतीने तळजाई पठार येथील विस्तृत भूभागावर वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा निश्चय केला.


या प्रसंगी त्यांचे पती अशोक कारंडे, मुलगा अमय कारंडे, सहकारी सोपानराव तुपे, पल्लवी तुपे, प्रार्थना तुपे, प्रथम तुपे, अभिजित कारंडे, आर्यन रणशिंग, संस्कृती करंजकर आणि प्रणव पाटील यांनीही सहकार्य करून त्यांना उस्फूर्तपणे साथ दिली.


सौ. कारंडे यांच्या या विधायक कार्यामुळे सर्व पर्यावरण प्रेमी कडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे !

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page