गजानन गव्हाणे पाटील
वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील माहेर संस्थेचे अतुल शेळके यांची पेरणे च्या वाघमारे वस्ती येथुन वर्धा येथे बदली झाल्याने वाघमारे वस्ती येथे त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. त्या मध्ये वाघमारे वस्ती येथील रहिवाश्यांनी त्यांना भेटवस्तू देऊन वस्तीच्या वतीने गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

त्यांना निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले, त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रतिक काळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात आजवर माहेर संस्थेने व अतुल शेळके सरांनी वाघमारे वस्ती झोपडपट्टी मध्ये १० वर्षे कौतुकास्पद कार्यकेले असून त्या मध्ये लहान मुलांमध्ये शैक्षणिक सांस्कृति कलात्मक ज्ञान ओळखून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरांनी खुप प्रयत्न केले व कोरोना काळात लोकांची परीस्थिती ओळखून त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. व त्यांनी संस्थेच्या माध्यमातून व संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसी दिदिंच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाचेही कौतुक केले.

या वेळी सारिका ताई काळे (हवेली तालुका अध्यक्षा लहुजी शक्ती सेना), उस्मान पठाण (सामाजिक कार्यकर्ते), मंगल ताई वामणे (ग्रा. पं. सदस्या, पेरणे), आदित्य वाघमारे (युवा कार्यकर्ते), जमिर भाई शेख (सामाजिक कार्यकर्ते), प्रतिक काळे (सामाजिक कार्यकर्ते), अनिता गायकवाड (शिक्षिका माहेर संस्था वाघमारे वस्ती), गायत्री निर्मळ (शिक्षिका माहेर संस्था वाघमारे वस्ती), माऊली वाल्हेकर, सचिन डाके, संतोष मलके, शंकर मलके, समिर पठाण, धीरज तामचीकर, सतिश मलके, अक्षय गरुड व समस्त ग्रामस्थ वाघमारे वस्ती उपस्थित होते.

सुत्रसंचलन संजय फाजगे यांनी केले. तर सर्व वाघमारे वस्तीचे अतुल शेळके सरांनी आभार मानले.





