गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील जगप्रसिद्ध जागृत देवस्थान म्हणून ओळखण्यात येणाऱ्या वाडेबोल्हाई येथील बोल्हाई माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत घेण्यात आला नाही बंधने उठल्यावर या वर्षी नेहमी प्रमाणे २६ सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे.

हवेली तालुक्यातील जगप्रसिद्ध आणि जागृत देवस्थान वाडेबोल्हाई येथील बोल्हाई माता मंदिरात नेहमी प्रमाणे या वर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी नवरात्रात विविध ठिकाणावरून भाविक दर्शनासाठी गर्दी होत असते रात्री बारा वाजेपर्यंत ढोल लेझीम, भजन, किर्तन, बहारदार नृत्य व गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी स्थानिक महीला व नागरिकांचा मोठा पुढाकार असतो. दसऱ्याच्या आदल्या दिवशी महाअभिषेक करून बळी दिला जातो. सकाळी दसऱ्याला सोने लुटण्याचा प्रथा असते अशी माहिती चेअरमन विठ्ठल गावडे यांनी दिली. मंदीर समिती व कार्यकर्ते यांचे नियोजनबद्ध कार्यक्रम घेण्यात येतो.






