गजानन गव्हाणे पाटील
आळंदी फाटा, लोणीकंद, ता. हवेली येथे मारुती सुझुकी च्या ” ऑटो ड्राईव्ह ” या सर्विस सेंटर चे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते शानदार उद्घघाटन नुकतेच संपन्न झाले.
आळंदी फाटा, ता. हवेली येथे हृषिकेश रघुनाथ लोणकर व राजेंद्र सुभाष वागस्कर यांनी सुरु केलेल्या मारुती सुझुकी च्या ऑटो ड्राईव्ह सर्विस सेंटर आणि अँपिअर इलेक्ट्रॉनिक बाईक शोरुम उदघाटन प्रसंगी ना. पवार बोलत होते.

यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, सुभाष जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदिपभाऊ कंद, रामभाऊ दाभाडे, प्रकाश मस्के, राजेंद्र सातव, संदेश आव्हाळे, सुनिल वागस्कर, अनिल चोंधे, किरण साकोरे, रुपेश शिवले अमोल शिवले, दत्तात्रय वागस्कर, पांडुरंग वागस्कर, सुधिर कंद आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, नोकरी आणि व्यवसाय या द्विधा मनस्थितीत तरुण असतात आणि नोकरीला प्राधान्य देऊन आयुष्यभर चाकरी करीत बसतात नोकरी मागणारे नाही तर देणारे व्हा. हृषिकेश लोणकर या तरुणाने धाडस करुन व्यवसाय सुरू केला आहे हे काम निश्चित कौतुकास्पद आहे.
रघुनाथ लोणकर यांनी स्वागत केले, प्रमोद शेवाळे, महेश शिवले यांनी परिश्रम घेतले साईराज कंद यांनी आभार मानले.

खुप दिवस मनात होतं काहीतरी नागरीकासाठी सेवा उद्योग – व्यवसाय करावा. मारुती मोटर्स व सर्व प्रकारच्या कारचे सर्विस सेंटर आणि अँपिअर इलेक्ट्रॉनिक बाईक शोरुम सुरु केले आहे. यामुळे आता ग्राहकांसाठी ग्रामिण भागात ग्राहकांसाठी निश्चित चांगली सेवा आम्ही देणार आहोत.
हृषिकेश लोणकर (ऑटो ड्राईव्ह, आळंदी फाटा, लोणीकंद)






