पुणे : प्रतिनिधी (सुभाष पाचारणे)
शिक्षकदिनी जाहिर झालेल्या रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने आंबेगाव बु! येथील उत्कर्ष प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या संस्थापिका सौ. शारदा चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

” दैनिक रयतेचा कैवारी” च्या तृतीय वर्धापन दिनी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील बापूसाहेब विसपुते महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या वेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांना रयतेचा कैवारी शिक्षणभूषण, रयतेचा कैवारी जीवन गौरव, रयतेचा कैवारी विशेष सेवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या अगोदर शारदा चव्हाण यांना विविध पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल भारत विद्या शिरोमणी व आय. ए. सी. न्यू. दिल्ली अवाॅर्डचा समावेश आहे.






