गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली येथे निसर्ग मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक ओझोन दिवस” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. ज्योतीराम मोरे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

यामध्ये ओझोन वायूचा स्थर कसा तयार होतो ? व तो कशाप्रकारे सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो . तसेच संरक्षण वायूच्या स्तराचा ऱ्हास कसा होत आहे ? व त्याचे संरक्षण आपण आपल्या जीवनशैलीतून कसे कमी करू शकतो? याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन ओझोन वायूच्या स्थराचे महत्त्व समजून सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किशोर देसर्डा यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यामध्ये मानवी जीवनात नैसर्गिक साधन संपत्ती महत्त्वाची आहे तेव्हा ही साधन संपत्ती मानवाने जतन करणे आवश्यक आहे असे सांगितले . सदर कार्यक्रमाचे संयोजन वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. देविदास पाटील व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चक्रधर शेळके व डॉ. माधुरी पगारिया यांनी केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.







