- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणविद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यकक्षिक ज्ञानही आत्मसात करणे गरजेचे : सतिश पंडित

विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यकक्षिक ज्ञानही आत्मसात करणे गरजेचे : सतिश पंडित

- Advertisement -spot_img

पेरणेतील एस.एस.क्लासने काढली पुणेतील कात्रज प्राणी संग्रहालयात शैक्षणिक सहल
कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
समाजामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थी,विद्यार्थिनीं हे शाळेमध्ये, क्लासेस तसेच आधी विविध क्षेत्रातील शिक्षणात पुस्तकी ज्ञान आपल्या शिक्षकांकडून घेतात.व त्यामध्ये वाचनाद्वारे पुस्तकी ज्ञानातून परीक्षा देतात.मात्र जेव्हडे पुस्तकी ज्ञान विद्यार्थी, विद्यार्थिनी घेतात तेच पुस्तकी ज्ञान प्रात्यक्षिक द्वारे त्याचा प्रत्यक्षात प्रयोग करून,अनुभव घेऊन त्याचा खरा अभ्यास केला जाईल त्यावेळी ते पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात अनुभवले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यकक्षिक ज्ञानही आत्मसात करणे गरजेचे असल्याचे पेरणे येथील एस.एस.क्लासचे मालक प्रोप्रायटर सतीश पंडित सर यांनी शैक्षणिक सहलीबाबत प्रतिक्रिया देत असताना सांगितले.


पेरणे फाटा, पेरणे, ता. हवेली गावातील एस. एस. क्लासेसच्या वतीने या क्लासेसचे मालक व प्राध्यापक प्रोप्रायटर सतीश पंडित सर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यकक्षिके किंवा क्षेत्रभेट ही तेवढीच महत्वाची समजून आपल्या क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ५० विद्यार्थी,विद्यार्थिनींची शैक्षणिक एकदिवसीय सहल ही एक महत्त्वपूर्ण ठिकाण निवडून पुणेतील,कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात यशस्वीरीत्या काढली.


या एक दिवशीय सहलीसाठी एस. एस. क्लासने पालकांची सभा घेऊन त्यांच्या संमतीने क्लास मधील एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करून ही सहल आयोजित केली गेली होती. या सहलीसाठी एकटे क्लासचे मालक व शिक्षक सतिश पंडित सर यांनी विद्यार्थ्यांना सर्व नियम, मानवी कर्तव्य, पर्यावरण-प्रेम, वन्यप्राणी संगोपन यावर माहिती देऊन प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राण्यांचे निरीक्षण केले आणि वहीमध्ये नोंदी घेतल्या.विद्याथ्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद देत तेथील वन्य-जीवाला आणि जंगली सपंत्तीला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली.विद्यार्थ्यांनी सर्व प्राणी निरीक्षण झाल्यानंतर एका ठिकाणी बसून तेथे नसलेल्या प्राण्यांची यादी तयार केली,व अहवाल तयार केला.


  या सहलीचे विद्यार्थ्यांनी अतिशय उपयुक्त सहल असे वर्णन केले.१२ वी विज्ञान वर्गातील रोहिणी ठोंबरे, सुरेखा मन्नाडे, प्रथमेश वर्पे, यश वाळके, सोमेश्वर भूते यांनी ही सहल वनस्पतिशास्त्र आणि जीवशास्त्र विषयातील एक प्रात्यकाक्षिक मानले. या सहलीसाठी सिद्धेश्वर स्कूल-बस सेवेचे मालक संतोष वाळके व गणेश वाळके तसेच विद्यार्थी समवेत असलेले बस-चालक कल्याण कचरे आणि राहुल परकड यांनी सहकार्य केले त्याबद्दल आम्ही सर्वांचे एस.एस.क्लासेसच्या वतीने आभार मानतो. असेच कार्य यापुढेही एस. एस. क्लासेस चालू ठेवणार असल्याचे सतीश पंडित सर,मालक व शिक्षक-एस.एस.क्लासेस पेरणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page