पुणे : (प्रतिनिधी- सुभाष पाचारणे)
स्वच्छता अमृत महोत्सवा निमित्त राबविण्यात येणाऱ्या “भारतीय स्वच्छता अभियान” अंतर्गत पुणे महानगरपालिका व दत्त नगर, (आंबेगांव बु.! पुणे) येथील श्रीचक्रधर परमानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीचक्रधर विद्यामंदिर प्राथमिक शाळा, श्रीचक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये शाळेतील इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला.

या वेळी शाळेच्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. तसेच या भागामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी रॅली काढली.यावेळी विद्यार्थ्यांनी घोष वाक्यांचे फलक हातात धरून घोषणा दिल्या व परिसरातील नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.
या अभियानाचे संपूर्ण नियोजन कॉलेजचे प्राचार्य घोलप सर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विश्वास कोचळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी केले. याप्रसंगी या भागाच्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षम नगरसेविका स्मिताताई सुधीर कोंढरे, संस्थेच्या कार्याध्यक्षा मेघाताई संजय कोंढरे, संस्थेचे अध्यक्ष महेंद्रदादा कोंढरे, संस्था प्रतिनिधी सुवर्णाताई कोंढरे, मोनालीताई कोंढरे, पुणे महानगरपालिकेचे या भागाचे मुकदाम विजय पवार, पंकज नेटके शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






