- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणदिवंंगत शिक्षकाच्या स्मरणार्थ रानमळ्यात रंगले काव्यसंमेलन

दिवंंगत शिक्षकाच्या स्मरणार्थ रानमळ्यात रंगले काव्यसंमेलन

- Advertisement -spot_img

पुणे : प्रतिनिधी सुभाष पाचारणे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा ( ता. खेड, जि पुणे), समस्त ग्रामस्थ रानमळा व म. सा. प. शाखा राजगुरूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत शिक्षक, महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार विजेते, साहित्यप्रेमी निसर्गवासी पी. टी. शिंदे गुरूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रानमळा प्राथमिक शाळेत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कविसंमेलनासाठी पुणे, पिंपरी, चिंचवड, निगडी, वडगाव शेरी, आळेफाटा, देहू , खराबवाडी, चाकण, निमगाव, अवसरी, सुदूंबरे व राजगुरूनगर परिसरातील ३० पेक्षा अधिक कवी कवयित्रींनी हजेरी लावली. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरूनगरचे अध्यक्ष संतोष गाढवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून यादवराव शिंदे, जि. र. शिंदे, मिलिंद शिंदे, रामदास शिंदे, सारिका शिंदे, गजानन पुरी, शांताराम थिगळे, मनिषा पवळे, बाळासाहेब सांडभोर, सतिश चांभारे व राजन जांभळे उपस्थित होते.


सरस्वती पूजन व पी.टी.शिंदे गुरूजींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कविसंमेलनाची सुरूवात झाली. सुरूवातीला पी. टी. शिंदेंना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करून जि. रं. शिंदे यांनी पी. टी. शिंदे यांनी राबविलेल्या वनराईचा रानमळा पॕटर्नबाबत उपस्थितांना माहिती दिली. कविता सादर करताना निसर्ग , वृक्षसंवर्धन, गणपती, कुटूंब, बाप, बळीराजा, देशभक्तीगीत, अंधश्रद्धा निर्मुलन गीत, कोरोना महामारी, शिक्षण आदी विविध विषयांवर कवींनी अतिशय सुंदर कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली.
डी. के. वडगावकर, डाॕ. हनुमंत भवारी, प्रल्हाद शिंदे, अशोक सांडभोर, अरूण कांबळे, संतोष गाढवे यांच्या कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. रामदास पुजारी, आत्माराम हारे, साहेबराव पवळे, विजय चव्हाण, प्रकाश गायकवाड, दीपक सोनवणे, मधुकर गिलबिले, बाबासाहेब गायकवाड, चंद्रकांत बोऱ्हाडे, बाबाजी शिंदे, संभाजी रणसिंग, सुभाष साळुंके, बाळासाहेब मुंडे, सतिश शिंदे, रविंद्र शिंदे, गणेश वायकर, लखन जाधव, विजय जाधव, देवेंद्र गावडे, चेतना कड, मेहमुदा शेख, योगिता कोठकर, अर्चना पोखरकर यांनी उत्कृष्ट काव्य सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली.


यावेळी सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेला रानमळा पॕटर्न हा देखावा तयार करण्यात आला होता. याप्रसंगी सर्व कवी व उपस्थित मान्यवरांना वृक्ष व गुलाबपुष्प भेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास शिंदे , नवनाथ वाघोले, प्रविण सुकाळे, गणेश भुजबळ, शांताराम वाघोले यांनी परीश्रम घेतले. भविष्यात साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम आयोजित करून रानमळा पॕटर्न राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. कविसंमेलनासाठी गावातील स्त्री पुरूष आणि मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाबाजी शिंदे यांनी तर आभार कै. पी. टी. शिंदे यांचे सुपुत्र मिलिंद शिंदे यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page