सासवड : प्रतिनिधी
एका विशेष कार्यक्रमात समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून विभागाच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अनुसूचित जाती व नव बौद्ध मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शासकीय वसतिगृहाचे गृहपालांचा सन्मान विभागाच्या वतीने करण्यात आला.
राज्यात विभागीय कार्यालयाच्या वतीने या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण पुणे विभाग पुणेचे बाळासाहेब सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे, तालुका पुरंदर येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण(शा. नि. शा ) आयुक्तालय समाजकल्याण,महाराष्ट्र राज्य, पुणेच्या उपायुक्त श्रीमती बंडगर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. नंदकुमार सागर हे होते.

पुणे विभागातून तीन मुख्याध्यापक तीन शिक्षक व तीन ग्राहकांना पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. त्यात मनोज वाघमारे (मुख्याध्यापक मुलींची शासकीय निवासी शाळा चांडोली,खेड), श्रीमती प्रमिला डावखर (मुख्याध्यापिका मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे ) व श्रीमती विमल खाडे (मुख्याध्यापिका मुलांची शासकीय निवासी शाळा पेठ) यांना पुरस्कृत करण्यात आले. तर पुणे जिल्ह्यातून गुरुनाथ कोयते, सांगली जिल्ह्यातून श्रीमती सीमा पवार, व सोलापूर मधून श्रीमती मृणाली कर्जगीकर या सहशिक्षकांना पुरस्कृत करण्यात आले. श्रीकांत आव्हाड (गृहपाल भोर जिल्हा पुणे), कमलाकर सारंगकर (गृहपाल बार्शी जिल्हा सोलापूर) ,व ए. एस. बरकडे (गृहपाल कराड जिल्हा सातारा) यांनाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मानण्यात आले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक दिलीप जी खेडेकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, श्रीमती संगीता डावखर, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा) मारुती मुळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे, समाज कल्याण अधिकारी मल्लिनाथ हरसुरे यांच्यासह विभागाचे अधिकारी ,कर्मचारी सहशिक्षक मुख्याध्यापक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन राजेंद्र शेलार व श्रीमती तनया डोंगरे यांनी केले. श्री कैलास आडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांनी आभार मानले. यावेळी सन्मानार्थी यांनी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या गौरव बद्दल समाजकल्याण विभागाचे धन्यवाद व्यक्त केले.







