कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
वाघोली, ता. हवेली येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वातानुकूलित बस आगारातील वाहक व चालकांचा सणासुदीच्या काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पीएमपीएमल चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे व संख्येकी अधिकारी घोगरे यांचे हस्ते प्रशिस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी दत्तात्रय झेंडे यांचे हस्ते ” माझे कर्तव्य ” या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी वाघोली आगाराचे प्रमुख सोमनाथ वाघोले, शरद ढमढेरे, महेश गायकवाड, रमेश भंडारे, राजेंद्र पांडे, बाबू फुंदे, जयदीप तमायचे, बाळासाहेब गावडे, सूर्यकांत खैरे, गणेश शिंदे, अनिल चौधर, अभिजात ढगे, राजेंद्र खैरे, रमेश कारागीर, संजय जगताप आदी प्रमुख व वाहक व चालक यावेळी उपस्थित होते.
यावेळी दत्तात्रय झेंडे यांनी नव्याने सुरू झालेल्या वाघोली आगारातील वाहक व चालकांचे अभिनंदन करत पीएमपीएमल च्या प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या सेवा देण्याचे आवाहन केले. तर आगार प्रमुख सोमनाथ वाघोले यांनी देखील ज्या वाहक व चालकांना पुरस्कार मिळाले त्यांचे विशेष अभिनंदन करत भविष्यात यापेक्षाही चांगले काम करून पीएमपीएमल च्या वाढीसाठी सर्वांनी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. सध्या वाघोली आगारातून सकाळपाळी व दुपारपाळी मिळून 98 बस कात्रज, हडपसर, मनपा, वारजे माळवाडी, निगडी या मार्गावर धावत आहेत. तर या भागातील प्रवाशांना वातानुकूलित बसेस उपलब्ध झाल्याने अनेक प्रवाशांनी देखील पीएमपीएमल चे आभार व्यक्त केले.
उल्लेखनीय काम करणारे वाहक अशोक सालके, रामदास जाधवर, विजय गवळी तसेच चालक राजकारण वाढवे, संतोष काटकर, मयूर खोमणे यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले.






