- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवडगाव शिंदे - काकडे च्या उपसरपंच पदी उल्का शिंदे बिनविरोध

वडगाव शिंदे – काकडे च्या उपसरपंच पदी उल्का शिंदे बिनविरोध

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
वडगाव शिंदे – काकडे, ता. हवेली ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच उल्का गणेश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच योगिता मच्छिंद्र शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच हेमलता विलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक दयानंद कोळी यांनी काम पाहिले.


यावेळी उद्योजक व विकास सोसायटीचे चेअरमन कल्याण (आबा) शिंदे, नागेश्वर दिंडीचे कार्याध्यक्ष सदाशिव रामभाऊ काकडे, उपाध्यक्ष बापू वामन काकडे, संचालक अंकुश रामचंद्र काकडे, हरिभाऊ काकडे, सरपंच हेमलता शिंदे, उपसरपंच योगिता शिंदे, माजी सरपंच भरत काकडे, देवराम काकडे, दिलीप काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सोनाली शिंदे, पप्पू शिंदे, उषा काकडे, मच्छिंद्र शिंदे, सुभाष बारणे, कुंडलिक शिंदे, सत्यवान शिंदे, बजरंग शिंदे, माऊली संभाजी काकडे, शहाजी काकडे, सुरेश गुलाब शिंदे, ह.भ.प. गणेश गोविंद शिंदे, किसन रामभाऊ काकडे, ह.भ.प. गणेश शिंदे, सोमनाथ काकडे, ग्रामपंचायत सदस्य भरत विष्णू काकडे, उद्योजक भीमराव शिंदे, उद्योजक संभाजी राजाराम शिंदे, रामभाऊ शिंदे, संजय ज्ञानोबा शिंदे, शिवाजी लक्ष्मण शिंदे, भगवान शिंदे, महेंद्र शिंदे, प्रकाश काकडे, हरीश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण काकडे, सदाशिव बाळासाहेब काकडे, शामकांत गोसावी, उद्योजक सतीश शिंदे, कैलास काकडे, वैभव शिंदे, स्वप्नील शिंदे, ग्रामपंचायत सदस्या शिवानी शिंदे, दीपाली शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
मूलभूत सुविधांचे बरोबरच महिला व मुलींसाठी गावात उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून महिला बचत गटांना देखील व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच उल्का गणेश शिंदे यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page