कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
धानोरे, ता. शिरूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचदी नुकतीच शिरुर तालुक्याचे प्रसिद्ध निवेदक शांतीलाल सदाशिव भोसुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच ऋतुजा भुषण भोसुरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कालिदास झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत शांतीलाल भोसुरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने धानोरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गोसावी यांनी काम पाहिले.
शांतीलाल भोसुरे यांची उपसरपंच पदी निवड झाल्यावर सर्वांचे फेटे बांधून फटाक्यांच्या आतिषबाजी करुन गुलालाची उधळण करुन जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी धानोरे गावचे अनेक आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि सर्व क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थितांमध्ये शिरुर पंचायत समितीच्या कार्यक्षम सदस्या अर्चनाताई भानुदास भोसुरे, माजी सरपंच भरतराव भोसुरे, ग्रामपंचायत सदस्य संदिप कामठे, राजेंद्र माशिरे, गुलाब बढेकर, अर्चना कोंडे, किसाबाई फदाले, वैशाली येवले, माजी सरपंच बापूसाहेब शेळके, देविदास भोसुरे, आनंदराव कामठे, माजी उपसरपंच भानुदास भोसुरे, संदिपशेठ भोसुरे, युवा उद्योजक हरिषशेठ येवले, माजी उपसरपंच याकुबभाई मुलाणी, योगिता भोसुरे, सोसायटीचे संचालक खंडूशेठ ढोले, सोनबा माशिरे, संभाजी माशिरे, सोसायटीचे संचालक सुभाष माशिरे, माऊली झगडे, सुरेश भोसुरे, सतिश झगडे, रामदास झगडे, विलास भोसुरे, संतोषशेठ भोसुरे, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा ज्योती भोसुरे, गुलाबराव भोसुरे, संजय संभाजी भोसुरे, कांतीलाल भोसुरे, संजय केरभाऊ भोसुरे, मधुकर कोंडे, बाळासाहेब माशिरे, नितिन कामठे, विजय भोसुरे, निलेश भोसुरे, अक्षय भोसुरे, राहुल डफळे, अमोल भोसुरे, ज्ञानेश्वर कामठे, रामदास कामठे, प्रदिप बाळू भोसुरे, यशराज शेळके, गणेश भोसुरे, हनुमंत घोडके, सोमनाथ पानसरे, त्याचप्रमाणे अॅडिको फोर्ज कंपनीतील मित्र परिवार उपस्थित होता.
रस्ते, लाईट, पिण्याचे शुद्ध पाणी तसेच गावात व वाड्यावस्त्यांवर आरोग्य व स्वच्छता या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देणार आहे. तसेच गावातील युवकांना नोकरी व स्वतः चे पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच शांतीलाल भोसुरे यांनी सांगितले.





