* केतन जाधव यांचे नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन *
वाघोली : प्रतिनिधी
वाघोली, ता. हवेली भारतीय जनता पार्टी वाघोलीच्या वतीने गुरुवारी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी केले आहे.

वाघोली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार (दि. १५ सप्टेंबर) रोजी (सकाळी १० ते ३ वा.) करण्यात आले असून मोतीबिंदू ऑपरेशन, डोळे तपासणी, चष्मे वाटप, एक्स रे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत माहिती व हृदय शस्त्रक्रिया, मेंदू विकार शस्त्रक्रिया, कॅन्सर, मणका विकार शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार आहेत. तसेच रक्तदान सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी दिली आहे.
लाईफ लाईन हॉस्पिटल, हेरंब फाउंडेशन, समता फाउंडेशन, मॅटरनिटी होम हडपसर, आरोग्य सेवक हिरामण तांबे आदींचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क प्रिया/जावेद ९१४६१६०४३६/९७६२७९७६७६





