- Advertisement -spot_img
Homeक्रीडाइंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी खेळाकडे एक आव्हान म्हणून वळावे : महादेव कासगावडे

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी खेळाकडे एक आव्हान म्हणून वळावे : महादेव कासगावडे

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद, ता. हवेली येथील श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये कबड्डी व व्हालिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक महाविद्यालयांनी भाग घेऊन हा राष्ट्रीय खेळ दिवस मोठ्या उत्साहात संपन्न केला. या प्रसंगी संस्थेचे क्रीडा संचालिका डॉ. सुषमा तायडे यांनी प्रास्ताविका करताना थोडक्यात महाविद्यालयात होणाऱ्या विविध खेळाविषयी माहिती देत सर्व महाविद्यालयांना खेळायला प्रोत्साहन देण्यासाठी खेळाचे तास ठेवण्यात येणार आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात महाविद्यालयात उपस्थित राहून खेळाकडे आकर्षित करता येईल.


पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागामध्ये अनेक खेळाडू तयार होत आहे व ते स्वतः ग्रामीण भागातील आहे. आज क्रीडा विभागात तरुण खेळाडूंची आवश्यकता असून त्यामधून तुम्ही स्वतःचे करियर करू शकता. त्यांनी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे खेळाकडे वळण्यासाठी आव्हान केले आहे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती उर्फ बापू भूमकर यांनी हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस हा राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो व त्यांनी मेजर ध्यानचंद यांना ध्यानचंद असे का म्हटले जाते याचा सविस्तरपणे विद्यार्थ्यांना सांगितले व त्यांच्या देशभक्ती, देश प्रेमाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना देत अभ्यासाबरोबर खेळाकडे पण विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली होदाडे यांनी केले. या कार्यक्रमात रब्बी आंतरराष्ट्रीय खेळाडू राकेश तोडकर हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश देसाई, प्राचार्य धनगेकर, डॉ. सुजाता राव, अनिल जमदाडे, विकास गायकवाड, व्यंकटेश राव, अंकुश कचे, सर्व विभाग प्रमुख , कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page