कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
शिवशंभो प्रतिष्ठाण, कोरेगाव भीमा (वढू रोड), या ठिकाणी मागील 14 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव व विविध उपक्रम दरवर्षी साजरे करण्यात येतात. यंदाचे वर्षी दोन वर्षांच्या कोरोना महामारी नंतर तब्बल 4 फूट उंच आकर्षक गणेशमूर्ती सभामंडपात विराजमान करण्यात आली. तसेच मंडळातील सर्व सभासद, महिला व मुलांसाठी संगीतखुर्ची, मटका फोड, रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.


शिवशंभो प्रतिष्ठाणच्या माध्यमातून वर्षभर विजयादशमी, दुर्गादौड, दहीहंडी, कृष्णजन्म, कोजागिरी, मकरसंक्रांत आदी सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. सामाजिक कार्य करत असताना कोरोना महामारीत काही कुटूंबांना किराणा किट वाटप करण्यात आले. तसेच या भागातील मुलींच्या लग्नात प्रतिष्ठाण च्या माध्यमातून भरघोस आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे मंडळाच्या सभासदांनी यावेळी सांगितले.
अष्टविनायक प्रतिष्ठाण, भैरवनाथ मंदिर यंदाची आकर्षक 5 फुटी श्रीमंत दगडूशेठ गणपती मूर्ती विराजमान करण्यात आली असून मंडळाचे यंदाचे 40 वे वर्ष असल्याचे प्रतिष्ठान चे अध्यक्ष शेखर सुपेकर व उपाध्यक्ष संकेत भोकरे यांनी सांगितले.


प्रतिष्ठाण ची गणेशोत्सव ची वर्गणीतून काही भाग लोणीकंद येथील मूकबधिर विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनसाठी खाऊवाटप करण्यात येणार आहे. संगीत खुर्ची, रांगोळी, लिंबू चमचा, लहान मुलांचा डान्स या स्पर्धांचे बरोबर इतर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर उपक्रम राबविणार येणार आहेत. तसेच वर्षभर दहीहंडी, धुलीवंदनाच्या, गणेशजन्म, दसरा, 15 ऑगस्ट खाऊवाटप, होळी, महिलांच्या विविध स्पर्धा, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात येत असतात.


अष्टविनायक प्रतिष्ठाण चे नंदू शिंदे, विशाल गव्हाणे, निखिल सुपेकर, अंकुश घटमाळ, अनिकेत कांबळे, मंगेश सुपेकर, सचिन गव्हने, रोहित सुपेकर, स्वप्नील भोकरे, दीपक गव्हाणे, विकी सुपेकर, रवी सुपेकर, गणपत घटमाळ, महेश घटमाळ, मंगेश शिंदे, विक्रम उपाध्याय, अमोल सुपेकर, संकेत सासवडे, श्रीकांत फडतरे, साहिल घावटे, मयूर घावटे, ऋषि घावटे आदी सभासद गणेशोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.





