कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
केसनंद येथील नागरिकांना गणेश विसर्जन करण्यासाठी केसनंद गावाचे माजी उपसरपंच सचिन जाधव यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा वाघोली गावाचे माजी उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने माजी सरपंच मिलिंद (नाना) हरगुडे, प्रकाश जाधव यांच्या मागदर्शनाखाली स्वखर्चातून हौद उपलब्ध करून देण्यात आला आहे.


त्यामुळे केसनंद येथील सोसाट्यामधील नागरिक व ग्रामस्थांना या हौदात गणेशाचे विसर्जन करता येणार आहे . विहरीमध्ये किंवा ओढ्या नदीमध्ये गणेशाचे विसर्जन केले जाते . त्यामुळे पाण्याचे प्रदुषण होते. रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने स्वखर्चाने हौद उपलब्ध करून देण्यात आला असून हौदात गणपती बाप्पांची विसर्जन करावे असे आवाहन माजी उपसरपंच सचिन जाधव यांनी गणेश भक्तांसह गणेश मंडळ व नागरिकांना केले आहे.






