केसनंद प्रतिनिधी : ज्ञानेश्वर पाटेकर
शिरूर हवेली चे विद्यमान आमदार एडवोकेट अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने केसनंद ता. हवेली येथे श्रीकांत (दादा) पाटोळे आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने भव्य महाआरोग्य शिबिर. पुना ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच श्रीकांत दादा पाटोळे यांच्या सहकार्याने आरोग्य कार्ड च्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

रक्तदात्यास हेडफोन व हेल्मेट या प्रसंगी भेट देण्यात आली. अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून व रक्तदात्यांनी याप्रसंगी रक्तदान करून या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुणे जिल्हा सरचिटणीस प्रदीप कंद, पुणे जिल्हा उपाध्यक्ष शोभा हरगुडे, हवेली तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे, संध्या भोरडे, कविता शेडगे, सीता जाधव, श्यामल लवटे, अल्पसंख्यांक सेलचे हसन शेख, ओबीसी सेलचे भरत चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि श्रीकांत दादा पाटोळे मित्र परिवारातील कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





