- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभुमकर परिवाराच्या वतीने गौराई पूजन उत्साहात साजरे

भुमकर परिवाराच्या वतीने गौराई पूजन उत्साहात साजरे

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री मारुती रामचंद्र भूमकर यांच्या लोणीकंद येथील राहत्या घरी दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी गणेशोत्सवातील गौराई पूजन उत्साहात साजरे करण्यात आले. भुमकर परिवारच्या राहत्या घरी या कार्यक्रमानिमित्त ठेवण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्थानिक महिला भगिनी उपस्थित झाल्या होत्या. त्यांनी गौराई पूजन मोठ्या उत्साहात व धार्मिक पद्धतीने केले.
याप्रसंगी कुसुम दत्तात्रय भूमकर, शैलजा मारुती भुमकर, पूजाताई प्रदीपदादा कंद, मोनिका श्रीकांत कंद, स्वाती पांडुरंग भूमकर, सीमा भरत आल्हाट, मृणाल स्वप्निल भुमकर, निकिता गौरव भूमकर आणि पंचक्रोशीतील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.
भुमकर परिवाराच्या वतीने सामाजिक सलोख्याचे असे अनेक उपक्रम वर्षानुवर्ष राबवले जातात, त्यामध्ये गोरगरीब व अनाथ मुलाचे लग्न लावून त्यांचा संसार सुरळीत करणे, गोरगरिबांना धान्य वाटप असेल गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सवलत असेल या आणि अशा अनेक प्रकारचे कार्य ते करत असतात त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच आसपासच्या स्थानिक परिसरातील लोकही त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असतात. मारुती रामचंद्र भूमकर व त्यांच्या परिवाराचा हा सामाजिक उपक्रम समाजासाठी एक आदर्शवंत ठरत असल्याची चर्चा पंचक्रोशी मध्ये आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page