कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद, ता. हवेली येथील श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग व बोर्गवर्ड टेकनॉलॉजि प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्लाऊड कम्प्युटिंग या आठ दिवशी कार्यशाळांमध्ये महाविद्यालयामधील व बाहेरील महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी AWS व Azure टेक्नाॅलीजीचे आठ दिवशीय कार्यशाळा पुर्ण वेळ प्रशिक्षण घेतले व प्रात्याक्षित करून पहिले. महाविद्यालयाने काळाची गरज ओळखुन AI & DS हा कोर्स नवीन सुरू केला असल्यामुळे क्लाऊड कम्प्युटिंग ही संकलपणा सर्वांसाठी नवीन आहे. त्याचे प्रशिक्षण विध्यार्थ्याना मिळावे यासाठी हि कार्यशाळा घेण्यात आली होती.
या मध्ये मुलांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय, क्लाऊड कम्प्युटिंग चे मुख्य फायदे , AWS व AZURE टेक्नाॅलीजीचे आठ दिवशीय कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण घेतले. बोर्गवर्ड टेकनॉलॉजि प्रा. लिमिटेडचे सौरभ देवतळे, अवणेश पावनीकर, रोहित नवले व जिगीषा यांनी विध्यार्थ्याना प्रशिक्षण दिले व त्यांच्याकडून प्रात्याक्षित करून घेतले. या प्रशिक्षणचा विध्यार्थ्याना भविष्यामध्ये नोकरीमध्ये उपयोग होणार असून त्यांना वेगवेगळ्या सॉफ्टवेर कंपनी मध्ये प्राधान्य मिळणार आहे. या प्रशिक्षणामुळे विध्यार्थ्याना डेटा सायन्स, डेटा अनालिटिकस, डेटा आर्किटेक अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रशिक्षणावेळी श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे संस्थापक अध्यक्ष मारुती (बापू ) भूमकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याना व शिक्षकांना संबोधीत करताना येणार दशक ये क्लाऊड कॉम्प्युटिंगचे असणार असून, या क्षेत्रात भरगोस वाढ व इन्व्हेस्टमेंट होणार असून तुम्हाला या कार्यशाळेचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश देसाई यांनी विद्यार्थ्याना क्लाऊड कॉम्प्युटिंगचे फायदे व भविष्यातील संधी या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन AI & DS डिपार्टमेंटच्या प्रमुख डॉ. सुजाथा राव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गिरिशा बोंबले यांनी केले.
या कार्यशाळे प्रसंगी इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते तसेच या कार्यशाळेसाठी प्रा. विकास गायकवाड, प्रा. गणेश केंद्रे, प्रा. तेजस्वी हुडे, प्रा. गीतांजली कडलग आदींनी परिश्रम घेतले.





