कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
महाराष्ट्र ऑलिम्पिक कराटे संघटनेच्या वतीने बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय चाचणी स्पर्धेमध्ये पदक मिळवून नॅशनल ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कोरेगाव भीमा येथील फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित फ्रेंड्स नर्सरी प्रायमरी सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आराध्या आकाश काशीद (कांस्य पदक), प्रणीत विठ्ठल मैन्दाड (कांस्य पदक). तसेच ज्ञानेश्वरी दत्तात्रय गावडे या विद्यार्थिनीने आळंदी येथे झालेल्या आंतरशालेय कुस्ती स्पर्धेमध्ये ४२ कि. वजन गटामध्ये सिल्वर मेडल मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा शाळेचे अध्यक्ष व माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, शाळेचे सचिव दिलीप भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नरेश्वर कुस्ती केंद्राचे वस्ताद योगेश भांडवलकर उपस्थित होते. तसेच मंचावर शाळेचे मुख्याध्यापक मदन हराळ, पर्यवेक्षिका अजीथाकुमारी नायर, दत्तात्रय सुभाष गावडे, संदीप यशवंत, गणेश गायकवाड, गणेश भंडारे, भारत लोंढे, संतोष भोगे उपस्थित होते.


संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अत्यंत प्रभावी शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रोत्साहित केले. तसेच संस्थेचे सेक्रेटरी दिलीप भोसले यांनी आयुष्यात पुस्तकी ज्ञाना बरोबर विद्यार्थ्यांनी मैदान हि गाजवले पाहिजे आणि ऑलिम्पिक पर्यंत घोडदौड केली पाहिजे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा भालेराव व दरेकर सर यांनी करत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.






