कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगांव भीमा, ता. शिरूर येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, नरेश्र्वर पाणी पुरवठा सह. संस्थेचे चेअरमन अशोक (भाऊ) नरहरी गव्हाणे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात आई, पत्नी, तीन मुली, मुलगा, दोन भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे.

गव्हाणे पाटील कुटुंब गावातील तसेच पंचक्रोशीतील विविध सामाजिक, सांस्कृतिक व राजकारणात सक्रिय असल्याने तमाम कोरेगाव भीमा गावावर शोककळा पसरली आहे. माजी उपसरपंच योगेश गव्हाणे पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश गव्हाणे पाटील यांचे ते बंधू होते.





