कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
वाघोली, ता. हवेली येथील भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मेजर, ध्यानचंद यांची 116 वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयात क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन अँड वॉक’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात एकूण 500 विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. यामध्ये ” दहा हजार पावले चालण्याचा व पळण्याचा उपक्रम” राबवण्यात आला.

या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी समृद्धी सावंत, भूमिका ईशी, आरती शिंदे, विद्यार्थ्यांमधून शुभम आव्हाळे, प्रणव सातव, सागर चेतन, दीपक कुंभार, चेतन राऊत, आदित्य भोंडवे, सागर नागरे, शिवानी सांगळे, तसेच माजी विद्यार्थी शिल्पा कोरी यांनी चालण्याचा उपक्रम वेळेत पूर्ण केला. याकरिता या सर्व विद्यार्थ्यांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला.

या उपक्रमासाठी महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख डॉ. रमेश गायकवाड, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजय गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. विपुल घेमूड, डॉ. स्वाती कोलट, उप प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, कला शाखाप्रमुख डॉ. सिद्धेश्वर गायकवाड, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. रूपाली गुलालकरी, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. बळवंत लांडगे, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा उपक्रम घेण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक गिरी यांनी मार्गदर्शन केले.






