- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीण"मूर्ती आमची किंमत तुमची'ला उदंड प्रतिसाद वाघोलीत "ज्ञानेश्‍वर कटके फाउंडेशन' चा अभिनव...

“मूर्ती आमची किंमत तुमची’ला उदंड प्रतिसाद वाघोलीत “ज्ञानेश्‍वर कटके फाउंडेशन’ चा अभिनव उपक्रम

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
 गणेशोत्सवात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती पूजनाबाबत फाउंडेशनकडून जनजागृती केली जात आहे. या उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती नागरिकांनी ठरविलेल्या किंमतीत दिली जात आहे. यातून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची जनजागृतीचा उद्देश साध्य होत आहे. “मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमांतर्गत यातून जमा झालेल्या रकमेतून गरूजू विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा समाज घटकांना मदत केली जाणार आहे, असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर (आबा) कटके यांनी सांगितले.


वाघोली परिसरात “मूर्ती आमची, किंमत तुमची’ हा अभिनव सामाजिक उपक्रम ज्ञानेश्वर कटके फाउंडेशनतर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक शाडू मातीच्या आकर्षक मूर्ती नागरिकांना जमेल त्या देणगी स्वरूपातील रकमेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. ज्ञानेश्‍वर कटके, बचत गट अध्यक्षा प्रियाताई यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्री गणेश तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मूर्तीची आगाऊ नोंदणी केलेल्या नागरिकांना ज्ञानेश्‍वर (आबा) कटके यांच्या हस्ते मूर्ती देण्यात आल्या.


याबाबत माहिती देताना कटके म्हणाले की, आम्ही पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा उपक्रम राबविला जात आहे. आम्ही निर्माण करत असलेल्या मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या असतात. कारखाना निर्मीत एकही वस्तू गणेश मूर्तीच्या निर्मीतीसाठी वापरली जात नाही. विशेष म्हणजे मूर्तीला कोणतेही विक्री मूल्य ठेवलेले नाही. सदर उपक्रमाच्या आयोजिका प्रियाताई म्हणाल्या की, आमच्याकडे 6 ते 12 इंच या आकारातील शाडूच्या विविध गणेश मूर्ती उपलब्ध आहेत. या उपक्रमांतर्गत किमान एक हजार मूर्तींपेक्षा अधिक मूर्ती देण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी ज्ञानेश्‍वर कटके यांच्या जनसंपर्क कार्यालयातून मूर्तीचे टोकन घ्यावे, असे आवाहन प्रियाताई यांनी केले.
ज्ञानेश्‍वर कटके फाउंडेशन, जनसंपर्क कार्यालयासह कलादालनात गणेश मूर्तीं मांडण्यात आलेल्या आहेत. सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत तेथून ग्राहक घेऊन जाऊ शकतात. दि.27 ते 31 ऑगस्ट सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमास नागरिकांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page