कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
मागील महिन्यात पीएमपीएमएल प्रशासनाने जिल्ह्यातील अनेक बस मार्गावरील बसेस तोट्याचे कारण देत बंद केले होत्या. यामध्ये वाघोली ते न्हावी सांडस या बस सेवेचा सुद्धा समावेश होता. गेली वीस वर्षापासून ” मनपा ते न्हावी सांडस” अशी बस सेवा सुरू होती मागील काही वर्षांपासून ती वाघोली ते न्हावी सांडस अशी सुरू झाली होती, या वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये नऊ गावांचा समावेश व इतर परिसरातील गावांचा समावेश होत होता.
या सात गावांमध्ये एसटी सारखी दुसरा कुठलीही सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी व महिलांचे हाल होत होते, यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संदीप (आप्पा) भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सर्व गावांचे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आल होते.
N
पै. संदीप भोंडवे मार्गदर्शनाखाली पुण्याचे मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन ही व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यात आली त्यांनी सुद्धा त्यास योग्य प्रतिसाद देऊन पीएमपीएमएल चे अधिकारी ना फोन लावून बस सुरू करण्याविषयी विनंती केली, शिष्टमंडळाने सुद्धा पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या मागणीचा पीएमपीएल प्रशासनाने योग्य तो अभ्यास करून बस सेवा सुरू केल्याने विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक, कामगार वर्ग, शेतकरी बांधव व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व गावांच्या वतीने पीएमपीएमएल प्रशासन, मा. महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, भाजप तालुकाध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे यांचे आभार मानले.
या शिष्टमंडळामध्ये बुर्केगावचे सरपंच संतोष पवळे, महाराष्ट्र वीज विद्युत मित्र समितीचे सदस्य विपुल शितोळे, डोंगरगाव चे माजी सरपंच संतोष गायकवाड, पिंपरी सांडस चे उपसरपंच दीपक लोणारी, ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब शिंदे, पेरणे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ वाळके या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता





