कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात बेरोजगाराना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली असून यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 1280 तरुणांनी नोंदणी केली आहे. सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात या तरुणाचा भव्य नोकरी मेळावा व मोफत जॉब वाटपाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदिपभाऊ वसंत कंद यांनी दिली.
आमदार ॶॅड. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन केले असून हवेली तालुक्यातील अनेक छोटे मोठे उद्योग सुरु आहेत तसेच हाकेच्या अंतरावरील रांजणगाव व सणसवाडी, फुलगाव, मरकळ या औद्योगिक वसाहतीत शेकडो कारखाने आहेत पण बेरोजगारांना योग्य मार्गदर्शन नसल्याने नोकरी मिळत नाही. दोन वर्षांच्या कोरोना काळात, लॉकडाऊन मुळे अनेक लोक बेरोजगार झाले. अगदी उपासमारीची वेळ बर्याच कुटुंबांवर आली. शिवाय सुशिक्षित नोकर ही अतिशय त्रासलेले आहेत. या दाहक पार्श्वभूमीवर हा भव्य नोकरी मेळावा, गरजूंना खूप सहाय्यभूत ठरणार आहे.
परिसरातील 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग या मेळाव्यामध्ये असणार आहे. मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात येणार आहे. 5 वी ते पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवीच्या अंतिम परीक्षेस बसणार्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून गरजवंत युवक युवतींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रदिपभाऊ कंद यांनी केले आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी युवक युवतींनी प्रदिप वसंत कंद यांच्या लोणीकंद येथील कार्यालयात फॉर्म भरून देणे बंधनकारक आहे. तसेच नावनोंदणी केल्यानंतर कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा मोबाईलवर कळवण्यात येणार असल्याचे प्रदिप कंद यांनी सांगितले.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





