गजानन गव्हाणे पाटील
औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या सणसवाडी, ता. शिरूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी नुकतीच दत्तात्रय नामदेव हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीबद्दल शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ॲड् अशोकबापू पवार यांनी हरगुडे यांचा सत्कार केला.
पुणे नगर महामार्गावर महत्त्वाची समजली जाणारी सणसवाडी ग्रामपंचायत, मोठी रहदारी, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्र असणारे सणसवाडी गाव बहु चर्चेत आहे, ग्रामपंचायतचे मावळते उपसरपंच सागर दरेकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी आज एकमेव अर्ज आल्याने दत्तात्रय हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर मिरवणूक, गुलालाची उधळण, फुलांची उधळण, ढोल ताशांच्या कडाडात, मिरवणूक काढण्यात आली, याप्रसंगी सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार पवार यांच्या हस्ते सत्कार करून, हरगुडे यांना खुर्चीवर विराजमान करण्यात आले. उपस्थितांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला, अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच संगीता हरगुडे, माजी सरपंच सुनंदाताई दरेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित (आप्पा) दरेकर, खरेदी विक्रीचे सभापती राजेंद्र नरवडे, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, माजी उपसभापती दत्ताभाऊ हरगुडे, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम सोनवणे, वढू बुद्रुक चे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, विजयराज दरेकर, माजी सरपंच युवराज दरेकर, सरपंच संगीता हरगुडे, मा उपसरपंच सागर दरेकर, नवनाथ दरेकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कानडे, शशिकला सातपुते, रूपाली दरेकर, राजेंद्र दरेकर, दिपाली हरगुडे, रामदास दरेकर, ललिता दरेकर, राहुल हरगुडे, स्नेहल भुजबळ, विजयराज दरेकर, सुवर्णा दरेकर,व मोठ्या संख्येने मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच दत्ता भाऊ हरगुडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून गावातील युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गावात मूलभूत सुविधांच्या बरोबर शासनाच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक योजना गावात व वाड्यावस्त्यांवर राबवून गाव सुजलाम- सुफलाम करणार असल्याचे दत्ताभाऊ यांनी याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सांगितले.





