- Advertisement -spot_img
Homeशालेयशिक्षणाची वाट कधीही सोडू नका : कटके

शिक्षणाची वाट कधीही सोडू नका : कटके

- Advertisement -spot_img

     ज्ञानेश्र्वर कटके यांनी विद्यार्थ्यांना दिला मोलाचं सल्ला       कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
शिक्षण हा प्रगतिशील जीवनाचा पाया आहे. जेवढा पाया भक्कम तेवढे यश पक्के असते. शिक्षणातून आत्मविश्वास वाढतो, त्यामुळे शिक्षणाची वाट कधीही सोडू नका, यासाठी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जी काही मदत लागेल, ती आपण करू, असे आश्वासन पुणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी केले.

                       वाघोली, ता. हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशन”च्या वतीने वाघोली परिसरातील १० वी आणि १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ज्ञानेश्र्वर कटके बोलत होते. ते म्हणाले की, आमच्या वेळी फक्त उत्तीर्ण झाले तरी चालत होते. आज तस राहील नाही. स्पर्धा खूप वाढली आहे. वैद्यकिय, अभियांत्रिकी कोणत्याही शाखेत जायचे असेल तरी पुन्हा प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात, पुन्हा त्यासाठी अभ्यास करावा लागतो. ते तुम्ही सर्व करत आहात, याचे कौतुक वाटते. यात खंड पडू देऊ नका, असेही कटके यांनी सांगितले.
यावेळी विष्णूजी शेकूजी सातव हायस्कूल मधील 10 वी आणि 12 वी मध्ये प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांना लॅपटॉप तर द्वीतिय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना टॅब, तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्याना मोबाईल, क्रमांक चारवरील विद्यार्थ्याना स्मार्ट वॉच तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन जवळपास 200 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कटके, मा. शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक भोसले, सातव हायस्कूलचे प्राचार्य अजिनाथ ओगले, मा. प्राचार्य नानासाहेब निंबाळकर, मा. सरपंच जयश्री सातव, राजेंद्र सातव, समीर भाडळे, दत्तात्रय बेंडावले, मच्छिंद्र सातव पाटील, रामकृष्ण नाना सातव, अनिल सातव पाटील, राजेंद्र सातव पाटील, सागर गोरे, मारुती आणा गाडे, सुनील चाचा जाधवराव, वसंत काका जाधवराव, जयश्री राजेंद्र सातव पाटील, गणेश गोगावले, विकास शिंदे, बाळासाहेब गोरे, सुधीर दळवी, सुनील काळे, मोसिम आबा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page