सणसवाडी प्रतिनिधी : ज्ञानेश्वर मिडगुले
संत निळोबाराय दिंडी सोहळ्यातील चिंचोली मोराची या दिंडीतील २५० वारकऱ्यांना उद्योजक एकनाथ नाणेकर यांच्या माध्यमातून नुकतेच पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून उत्तम दर्जाच्या रेनकोटचे वाटप पायी पालखी सोहळ्यात करण्यात आले.
पावसाळा सुरु झाल्यामुळे वारकरी पावसाने भिजून आजारी पडू नये म्हणून सरपंच अशोक गोरडे, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष रामभाऊ धुमाळ, उपाध्यक्ष बाळासाहेब कारंडे, हभप चंद्रकांत नाणेकर, शहाजी विरोळे या मान्यवरांचे हस्ते वारकरी म्हणून चालणाऱ्या २५० भाविकांना रेनकोट वाटप करण्यात आले.
चिंचोली मोराची या दिंडीची शिस्त व नियोजना बदल ख्याती असलेने अवघ्या ६ वर्षात ५० ची २५० वर वारकरी संख्या पोचून राज्यात ९ व्या नंबरवर पोचली आहे. मानाच्या ६ फूटी खिलारी बैल जोडीने सर्वांचे लक्ष वेधले. बैलाच्या देखभालीसाठी साहेबराव नाणेकर, सुभान नाणेकर, रसीक फंड, हभप संतोष फौजीसह ६-७ माणसे राबतात. सरपंच अशोक गोरडे हे निवृत एसीपी असून ते सपत्नीक दिंडी बरोबर पायी चालत आहेत हे विशेष !
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





