कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. सेवाधाम विद्यालयाचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. निम वैद्यकीय अधिकारी नृसिंह कुलकर्णी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास अधिक्षिका भाग्यश्री चिलाञे, शिक्षक प्रतिनिधी संजय पोटफोडे व सर्व कर्मचारी वृंद व विशेष विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका शुभांगी पायमोडे यांनी केले तर आभार सोनाली शिनगारे यांनी मानले.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





