कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असून यांमधूनच उद्याचे शासकीय अधिकारी व उद्योजक निर्माण होतील. तसेच या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे असून प्रत्येक विद्यालयात लावावे असे मत
अँड. विकास बाळासाहेब फडतरे यांनी व्यक्त केले.
आपटी, ता. शिरूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या शुभारंभ प्रसंगी फडतरे बोलत होते. यावेळी फडतरे पुढे म्हणाले की, ग्रामीण भाग असून ही येथील विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ते बरोबर खेळ व इतर क्षेत्रात ही आघाडीवर आहेत. तसेच या पुढे शाळेसाठी लागणारी सर्व शैक्षणिक सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी विकास फडतरे यांनी दिले. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र ढगे यांच्या जाणीव एक शैक्षणिक संघटना व ग्रामस्थांच्या माध्यमातून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उद्योजक सोमनाथ ढगे, उपसरपंच रेणुका गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे, सुनीता शिवले, शाळा व्यवस्थापन समिती आपटी तसेच जाणीक एक शैक्षणिक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र ढगे, सुवर्णा ढगे, किरण ढगे, प्रशांत गोसावी, स्वप्नील ढगे, सागर ढगे, ऋषिकेश ढगे आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन विद्यालयाचे मुख्याध्यापक काळूराम भिलारे, नितिन थिटे, चंदसेना शेळके, विजया दिवटे, ज्योती धुमाळ यांनी केले.
सुत्रसंचालन व आभार नितिन थिटे यांनी केले





