कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
” योगा करा योगी बना “असा संदेश देत विद्यार्थ्यांनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योगा करण्याचे आव्हान संस्थेचे सचिव दिलीप भोसले यांनी केले.
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील फ्रेंड्स एज्युकेशन इंस्टिट्युट संचलित फ्रेंड्स नर्सरी, प्रायमरी आणि सेकंडरी स्कुल मध्ये जागतिक योग दिवस संपन्न झाला त्यावेळी भोसले बोलत होते. योगा दिनाचे महत्व व योगाचे प्रात्यक्षिक शाळेचे मुख्याध्यापक एम. एन. हराळ पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थ्यांना सांगत प्रात्यक्षिक करून घेतले. यामध्ये ओम मेडीटेशन, योगाचे महत्व, कपालभाती, अनुलोम विलोम भस्त्रिकाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक करून दाखविले . या उपक्रमात शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी योगदिनाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात उत्साहीपणे सहभागी झाले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे यांनी जागतिक योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेखा भालेराव यांनी तर आभार अनिताकुमारी नायर यांनी मानले.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





