कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोरेगाव भीमा येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व जुनियर कॉलेज येथे जागतिक योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांचे बरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील यामध्ये सहभागी झाले होते.
योगा दिनाचे महत्त्व, योगासनांचे फायदे व प्रत्यक्ष योगा विद्यालयाचे शिक्षक संतोष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविले. सर्व विद्यार्थ्यी योगासना मध्ये सहभागी झाले. त्यावेळेला प्राचार्य माणिक कुंभारकर व प्रभारी पर्यवेक्षक भगवानराव बेल्हेकर यांच्यासह पुष्पलता गिरी, शरयू कांबळे, अनिल साकोरे, राजाभाऊ कदम, संतोष सोनवणे, वर्षा परीट, गणेश नांगरे, सुनिता सुतार, वर्षा वाजे, संभाजी कोल्हे, विजय देशमुख, ज्ञानेश्वर गावीत, रमेश गावडे, करण कुटेमाटे, वृषाली काळभोर, किशोर गव्हाणे, अनिल गव्हाणे, नागेश गाडेकर, महेश फडतरे, रुक्मिणी बोराटे आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





