कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचा एकाचवेळी योग दिवस साजरा करण्यात आला.
प्रार्थना, पुरक हालचाली, मानेचे व्यायाम, दंडस्थितील आसने त्यामध्ये ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, ञिकोणासन, तर बैठक स्थितीतील आसनांमध्ये दंडासन, भद्रासन, वज्रासन, उष्ट्रासन, शशांकसन, वक्रासन, पोटावर झोपून करायची आसनांमध्ये मकरासन, भुजंगासन, शलासन, इत्यादी आसने त्याचबरोबर कपालभाती व प्राणायामामध्ये नाडीशोधन प्राणायम, अनुलोम विलोम प्राणायम इत्यादी नंतर शांतीपाठाने समारोप करण्यात आला. सर्व विशेष विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
क्रिडा शिक्षक संजय पोटफोडे, मुख्याध्यापक पवन कट्यारमल, मानसशास्त्रज्ञ नृसिंह कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिके सादर केली. तर सोनाली शिनगारे, वनिता बावनेर व शुभांगी पायमोडे यांनी विशेष विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





