- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमा जि. प. शाळेत जागतिक योगदिन साजरा

कोरेगाव भीमा जि. प. शाळेत जागतिक योगदिन साजरा

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तब्बल 650 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी योगासने केली.
सुष्म व्यायाम, सूर्य नमस्कार, प्राणायम, योगासने, तसेच योग दिनाचे महत्व व योगाचा आपल्या शरीरावर व मनावर होणार परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. तर ध्यान धारणा करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी योग महत्वाचा असून संपूर्ण जगात योग दिन साजरा केला जात असल्याचे यावेळी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापीका वनिता कालप यांनी यावेळी सांगितले.
विद्यालयाचे शिक्षक तुकाराम सातकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुसुम बांदल, शैलजा टाकळकर, सुरेश सातपुते, इंदुमती शेळके, चंद्रकला कुसाळे, रुपाली बावकर, सरोज सातकर, जयमाला मिडगुले, शीतल डिके, निवृत्ती सुरडकर, गणेश दाते यांनी मुलांना प्रत्यक्ष योगा करत मार्गदर्शन केले.
यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बापू राऊत, उपाध्यक्ष दमयंती कांचन, सरपंच अमोल गव्हाणे, माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, समिती सदस्य शशिकांत गव्हाणे, नागेश गव्हाणे आदींनी यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page