सासवड : प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे, ता. पुरंदर चा यंदाचा एसएससी चा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. प्रमिला को. डावखर यांनी दिली.
विद्यालयातील इयत्ता दहावीच्या परीक्षेतील विद्यार्थी
प्रथम क्रमांक : रोशन हुण्या वसावे 78.40 टक्के, द्वितीय क्रमांक : चेतन रमेश वळवी 78.20 टक्के, तृतीय क्रमांक : विराज राजेंद्र गाडे 75 टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांचे समाजकल्याण च्या मा. सहाय्यक आयुक्त श्रीम. संगीता डावखर व सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांजकडूनयशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





