- Advertisement -spot_img
HomeUncategorizedदहावीच्या निकालात कोरेगाव भीमाच्या छत्रपती संभाजी विद्यालयातील मुलींचा डंका

दहावीच्या निकालात कोरेगाव भीमाच्या छत्रपती संभाजी विद्यालयातील मुलींचा डंका

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
यशाची परंपरा कायम राखत कोरेगाव भीमा, ता . शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील यंदाच्या वर्षी १० वीच्या निकालामध्ये मुलींचा डंका वाजला असून शाळेचा निकाल ९४.०७ लागला असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य माणिक कुंभारकर, प्र. पर्यवेक्षक भगवानराव बेल्हेकर यांनी सांगितले. या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. दहावीचा निकाल उत्कृष्ट लागला असून एकूण १४३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे.
10 वी मध्ये विद्यालयात आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :
प्रथम क्रमांक : अश्विनी अभय काटे – ८ ९ .८० टक्के, द्वितीय क्रमांक : वैष्णवी संतोष बारवकर – ८८ % टक्के, तृतीय क्रमांक :सिमरन जयउद्दीन शेख ८७.२० टक्के, चतुर्थ क्रमांक : सौरभ राजेश कांबळे – ८६.८० टक्के, पाचवा क्रमांक : दीपक पांडुरंग राऊत ८६.२० टक्के यांनी यश संपादन केलं आहे.
                    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका पुष्पलता गिरी, वर्ग शिक्षिका शरयू कांबळे तसेच विषय शिक्षक अनिल साकोरे, राजाभाऊ कदम, संतोष सोनवणे, वर्षा परीट, गणेश नांगरे, सुनिता सुतार आदींनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत चे सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे यांच्यासह शालेय शिक्षण समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page