- Advertisement -spot_img
HomeUncategorizedश्रीक्षेत्र तुळापूर च्या उपसरपंच पदी राजाराम शिवले (पाटील) बिनविरोध

श्रीक्षेत्र तुळापूर च्या उपसरपंच पदी राजाराम शिवले (पाटील) बिनविरोध

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
                      श्रीक्षेत्र तुळापूर, ता. हवेली ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच राजाराम शिवाजी शिवले पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच नवनाथ रघुनाथ शिवले पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. यावेळी उपसरपंच पदासाठी सरपंच गुंफा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी राजाराम शिवले यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक मिलिंद महाले यांनी राजाराम शिवले पाटील यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी माजी उपसरपंच पवन खैरे, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा शिवले, सुवर्णा राऊत, अर्चना पुजारी, वर्षा शिवले, सुवर्णा शिवले, माजी सरपंच रंगनाथ शिवले, माऊली शिवले, गणेश पुजारी, रुपेश शिवले, माजी उपसरपंच अमोल शिवले, राहुल राऊत, शिवाजी शिवले, संतोष शिवले, विकास सोसायटी चे चेअरमन रमेश शिवले, व्हा. चेअरमन आप्पासाहेब जगताप, माजी चेअरमन राजाराम शिवले, मारुती शिवले, पांडुरंग शिवले, दत्तात्रय सीताराम शिवले, पीडिसीसी बँकेचे व्यवस्थापक योगेश माणिक शिवले, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय चव्हाण, पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर रामचंद्र शिवले (पाटील), संजय बंडू शिवले, खंडू किसन शिवले, शहाजी दौंडकर, नवनाथ किसन शिवले, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब तुकाराम शिवले, माजी व्हा. चेअरमन सुभाष चंद्रकांत शिवले, प्रकाश कारभारी शिवले, दत्तात्रय आनंदा शिवले, संचालक शंभूराजे दिलीप एकनाथ शिवले, प्रदीप साहेबराव शिवले, किसन पुजारी, पंडित शिवले, गणेश शिवले, जयसिंग शिवले, अनिल खंडू शिवले, अंकुश शिवले, दिलीप जठार, हनुमंत दादाभाऊ शिवले, सोपान शिवले, योगेश रामचंद्र शिवले, संतोष माधव शिवले, शिवाजी आनंदा शिवले (पाटील), अरुण बापू शिवले, बाळासाहेब हाके, सुरेश शिवले, भरत राऊत, सुनील राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
              ” महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून प्रयत्न करणार असून नागरिकांना रस्ते, स्ट्रीट लाईट, पिण्याचे शुद्ध पाणी, तसेच श्रीक्षेत्र तुळापूर ला पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच राजाराम शिवले (पाटील) यांनी यावेळी सांगितले. “

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page