- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआईच्या अंतयात्रेत विरहाने वारकरी मुलाने ही घेतला जगाचा निरोप

आईच्या अंतयात्रेत विरहाने वारकरी मुलाने ही घेतला जगाचा निरोप

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
” आई असेल सोबतीला तर विषय सुद्धा अमृत होईल,
आई नसेल सोबतीला तर सावलीत सुद्धा चटके देईल “
आई मध्ये मुलाचा जीव गुंतलेला असतो. आई नसेल तर जीव ओवाळून टाकायला मुलगा तयार होतो. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पेरणे, ता. हवेली येथे घडली. श्रीमती कृष्णाबाई हनुमंत वाळके (वय ९२ वर्ष) याचे वृदापकाळाने रविवारी रात्री ८ वाजता मृत्यू झाला. त्याची सोमवारी सकाळी १० वाजता अंतयात्रा निघाली स्माशान भुमी जवळ ‘विसावा’ साठी खांदेकरानी देह ठेवला त्याच वेळी मुलींनी सुनानी दुःखाचा ठाहो फोडला याच वेळी आईच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने मुलालाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. आईची माया खरचं वेडी असते.
पेरणेचे माजी सरपंच शिवाजी हनुमंत वाळके पाटील (वय ६५ वर्ष) याचे यावेळी निधन झाल. आईच्या पाठोपाठ मुलाची अंतयात्रा निघाली. हृदय पिळवून टाकणारी घटना होती. संपूर्ण पेरणे गावात दुःखाची शोककळा पसरली होती. तिन मुले आणि एक विवाहित मुलगी. मुलांना सुना नातवड आईच्या मायेची जिव्हाळाची नेहमीच ओढ. मुलगा आईवर जीव ओवाळून टाकायला मागेपुढे पाहात नाही. सोमवारी पेरणे गावात त्याची प्रचिती आली. शिवाजी वाळके शिवाअण्णा म्हणून गावात व पंचक्रोशीत परिचित होते. गावात पाच वर्ष सरपंच होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देहु ते पंढरपूर पायी वारीत असलेल्या सिध्देश्वर प्रासादिक दिंडीचे स्थापने मध्ये सहभाग होता उपाध्यक्ष म्हणून काम पहात होते. सलग दहा वर्ष पायी वारी केली गावातील यात्रा, जत्रा, अखंड हरिनाम सप्ताह, गणपती उत्सव, नवरात्र, जयंती, पुण्यतीथी असे विविध कार्यक्रम त्याच्या शिवाय पार पाडत नसत. पण आईचा मृत्यू झाला, हेच त्याच मन स्वीकारायला तयार नव्हते. ते समाजात वावरत होते काही सुचना देत होते. आईच्या जाणे सांगण्या पलिकडे होते.
गावकी भावकी पै पाहुणे सर्व गोतावळा स्मशान भुमित घेऊन गेले. आई आपल्याला सोडून जाणार हा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु त्यापूर्वीच त्यांनी मृत्यूला जवळ केले. आणि आईला कवटाळून आई बरोबरच गेले.
त्याच्या मागे सहा विवाहित मुली दोन भाऊ एक बहीण सुना जावई नातवडे असा मोठा परिवार आहे. माजी पोलिस पाटील बबनराव हनुमंत वाळके यांचे भाऊ होत. पेरणे विकास सोसायटी चे संचालक विनायक वाळके याचे चुलते होत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page