- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रमवाघजाई माता मंदिराचा सातवा वर्धापनदिन उत्साहात साजरा

वाघजाई माता मंदिराचा सातवा वर्धापनदिन उत्साहात साजरा

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
” वाघजाई माता की जय ” च्या जयघोषात वडगाव शिंदे काकडे, ता . हवेली येथील वाघजाई माता मंदिराचा 7 वा वर्धापनदिन मोठ्या थाटामाटात शेकडो भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वर्धापनदिनाचे निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. वाघजाई मातेची नित्यपूजा करत उद्योजक व इंद्रायणी विकास सोसायटी चे विद्यमान चेअरमन कल्याण (आबा) शिंदे यांनी सपत्निक देवीचा महाभिषेक व कुंकुम अर्चन विधी केला. महाभिषेक व महाआरतीचे पौरोहित्य वेदमूर्ती बालाजी रमेश कुलकर्णी (गुरुजी) व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

यावेळी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारी भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी आनंद आखाडा नाशिक चे महंत व वाघजाई माता देवस्थान ट्रस्ट चे स्वामी गिरीजानंद सरस्वती, वडगाव शिंदे च्या सरपंच हेमलता शिंदे, माजी सरपंच विजय शिंदे, रमेश काकडे, भरत काकडे, माजी उपसरपंच पप्पू शिंदे, व्हा. चेअरमन युवराज काकडे, उद्योजक यमराज खांदवे, राजेंद्र खांदवे, माजी सभापती अशोक (बापू) खांदवे, बंडू खांदवे, नवनाथ मोझे, बापूसाहेब काकडे, गणेश खांदवे, विश्वास काकडे, राम काकडे, सुनील काकडे, हरिभाऊ काकडे, विशाल शिंदे, स्वप्नील शिंदे, विकास काटे, कांतीलाल शिंदे, भीमराव शिंदे, नितीन काकडे, वैभव शिंदे, अजय शिंदे, ऋषींनाना शिंदे, अथर्व शिंदे, प्रसाद शिंदे, संभाजी रामचंद्र शिंदे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page