- Advertisement -spot_img
Homeराजकारणदत्तकृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी विलास जाधव तर व्हा. चेअरमन...

दत्तकृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी विलास जाधव तर व्हा. चेअरमन पदी शारदा वारघडे यांची बिनविरोध निवड

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य लागलेल्या बकोरी, ता. हवेली येथील दत्तकृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत वारघडे यांचे जवळचे सहकारी विलास जाधव तर व्हा. चेअरमन पदी शारदा तुळशीराम वारघडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दत्तकृपा सहकारी पॅनेल ने समोरील विरोधाकाना धक्का देत ११/० ने विजय हस्तगत केला होता. त्यामध्ये दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. संस्थेच्या वाघोली येथील कार्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक पार पडली त्या ठिकाणी चेअरमन पदासाठी विलास जाधव व व्हा. चेअरमन पदासाठी शारदा वारघडे यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विजय माळवदकर यांनी दोन्हीही पदाधिकारी यांची बिनविरोध निवड जाहीर केली संस्थेचे सचीव दिनकर दहीफळे व निवडणूक निर्णय अधिकारी विजय माळवदकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संस्थेचे संस्थापक व विद्यमान संचालक चंद्रकांत वारघडे, प्रकाश कुटे, सर्जेराव कुटे, उत्तम बापू वारघडे, राजेंद्र वारघडे, बाप्पुसाहेब कांबळे, रामराव कुटे, विकास जाधव, सागर कुटे, राजेश कुटे, किसनराव शितकल, किसन टुले, पांडुरंग वारघडे, योगेश वारघडे, दिपक जाधव यांनी प्रयत्न केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page