- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसुखदेव भीमराज वागस्कर यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

सुखदेव भीमराज वागस्कर यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
देशसेवा करून सरकारी नोकरीतून सेवा निवृत्त झाल्याबद्दल फुलगाव, ता. हवेली येथील सुखदेव भीमराज वागस्कर यांच्या सेवा निवृत्ती बद्दल अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच चोंधे लॉन्स येथे पार पडला.
यावेळी त्यांचा त्यांचे कुटुंब, पाहुणे व विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष नागरी सन्मान करण्यात आला. आता पर्यंत देशसेवा केली आहे तसेच यापुढील काळात आपल्या गावासाठी, सामाजिक कार्यात तसेच शेती साठी पुढील जीवन घालवणार असल्याचे यावेळी सुखदेव वागस्कर यांनी सांगितले.
या प्रसंगी समाज प्रबोधन केंद्राचे संस्थापक उत्तमराव भोंडवे, उद्योजक कांतीलाल ढेरंगे, गुलाबराव कुंजीर, सरपंच मंदानानी साकोरे, माजी सरपंच नारायणराव खुळे, सोमनाथ खुळे, सुनील वागस्कर, अशोक वागस्कर, नामदेव वागस्कर, बाजीराव शिवले, शंकर लोखंडे, पीडीसीसी बँक पेरणे फाटा चे व्यवस्थापक सुनील घुमटकर, माजी उपसरपंच कांतीलाल साकोरे, कांताराम वागस्कर, भानुदास साकोरे, राहुल वागस्कर, संध्या शिनगारे, शिरूर हवेली प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष पोपट शिवले, चेअरमन हरिभाऊ गवारे, बबुशा ढेरंगे, माजी चेअरमन दिलीप वागस्कर, किसनराव रेटवडे, वसंत रेटवडे, प्रतीक गवळी, योगेश सातव, निखिल घोलप, विजय साकोरे, शंकर ज्ञानोबा वागस्कर, रामदास ज्ञानोबा वागस्कर, बाळासाहेब भीमराज वागस्कर, रामदास भीमराज वागस्कर, जयवंतराव खुळे, वामन खुळे, दादाभाऊ खुळे, अजय वागस्कर, विजय वागस्कर, बाळासाहेब ढगे, मच्छिंद्र वागस्कर, आदिनाथ साकोरे, प्रकाश शिवले, किशोर पाटोळे, सोमनाथ वागस्कर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर वागस्कर, मुख्याध्यापक सुभाष लोंढे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी ह. भ. प. गुलाबराव करूंजले (सर) यांचे प्रवचन झाले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन माजी उपसरपंच व उद्योजक आनंदा वागस्कर, नंदू वागस्कर, कीर्ती गवळी, स्वाती सातव, ज्योती घोलप, विजय नंदू वागस्कर, अजय वागस्कर यांनी केले. सूत्रसंचालन माजी उपसरपंच राहुल वागस्कर यांनी तर आभार माजी सरपंच नारायणराव खुळे यांनी मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
        आजच्या धकाधकीच्या जीवनात अन्न, वस्त्र, निवारा यांच्या बरोबरीने मोबाईल ला महत्व आहे. याच मुळे या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्याबद्दल सुखदेव वागस्कर यांनी त्यांचे जावई प्रतीक गवळी, योगेश सातव, निखिल घोलप यांना मोबाईल भेट दिले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page