कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
जागतिक तापमान वाढीला थांबविण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव उपाय असून नागरिकांनी जिथे जागा मिळेल तिथे एकतरी वृक्ष लावावे असे आवाहन डायनापॅक रोड कन्स्ट्रक्शन एक्युपमेंट इंडिया प्रा. लि. कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित सोम यांनी केले.
फुलगाव, ता. हवेली येथील डोंगरावर नुकतेच डायनापॅक फयात ग्रुप कंपनी च्या माध्यमातून डायनापॅक रोड कन्स्ट्रक्शन च्या पुढाकाराने विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण फुलगाव च्या विद्यमान सरपंच मंदानानी साकोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सरपंच मंदानानी साकोरे यांनी डायनापॅक कंपनी चे वृक्षारोपण केले त्याबद्दल आभार मानत लावलेली झाडे जगविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल तसेच अशाच प्रकारचा सामाजिक उपक्रम इतर कंपनी व सामाजिक संस्थांनी राबविण्याचे आवाहन मंदानानी साकोरे यांनी केले.
यावेळी माजी उपसरपंच राहुल वागस्कर, राजेंद्र खुळे, संध्या शिनगारे, ज्योती गवारे, ग्रामसेवक डी. के. पवार, डायनापॅक कंपनी चे क्वालिटी प्रमुख अमोल जोशी,एच. आर. राहुल पवार, फायनान्स प्रमुख अनुभव माहेश्वरी, एच. आर. नीती आनंद, डिझाइन प्रमुख दादासाहेब ढोकले, लॉजीस्टिक प्रमुख आणि बिधू मोहांती आदी उपस्थित होते.





