कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
वडगाव शिंदे – काकडे, ता. हवेली येथील इंद्रायणी ग्रामीण बिगरशेती सहकारी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी कल्याण (आबा) अंकुश शिंदे यांची तर व्हा. चेअरमन पदी युवराज आबाजी काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी उमेश थिटे यांनी तर त्यांना संस्थेचे सचिव गायकवाड यांनी सहकार्य केले.
याआधी सोसायटीच्या निवडणुकीत नागेश्वर महाराज शेतकरी सहकारी पॅनेलने माजी उपसरपंच विलास नाथु काकडे, उद्योजक कल्याण (आबा) शिंदे, माजी सरपंच रामभाऊ गुलाब काकडे, माजी सरपंच विजय शिंदे, रमेश काकडे, माजी चेअरमन जयदीप पोपट शिंदे यांच्या नेतृत्वात 11 जागा जिंकत तर 2 जागा बिनविरोध करत सोसायटी वर आपला झेंडा रोवला. त्यामुळे सोसायटी च्या चेअरमन व व्हा. चेअरमन ची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी विद्यमान संचालक खंडू किसन काकडे, बाबा ज्ञानोबा काकडे, युवराज आबाजी काकडे, सुनील तुळशीराम काकडे, कल्याण अंकुश शिंदे, कांतीलाल उत्तम शिंदे, जयदीप पोपट शिंदे, नितीन प्रभाकर शिंदे, अनुसया सुभाष बारणे, सुमन तुकाराम शिंदे, चंद्रकांत कोंडीबा गायकवाड, युवराज सदाशिव काकडे, प्रदीप नारायण चव्हाण उपस्थित होते.
नागेश्वर दिंडीचे कार्याध्यक्ष सदाशिव रामभाऊ काकडे, उपाध्यक्ष बापू वामन काकडे, संचालक अंकुश रामचंद्र काकडे, हरिभाऊ काकडे, सरपंच हेमलता शिंदे, उपसरपंच योगिता शिंदे, माजी सरपंच भरत काकडे, देवराम काकडे, दिलीप काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सोनाली शिंदे, पप्पू शिंदे, उषा काकडे, मच्छिंद्र शिंदे, सुभाष बारणे, कुंडलिक शिंदे, सत्यवान शिंदे, बजरंग शिंदे, माऊली संभाजी काकडे, शहाजी काकडे, सुरेश गुलाब शिंदे, ह.भ.प. गणेश गोविंद शिंदे, किसन रामभाऊ काकडे, सोमनाथ काकडे, ग्रामपंचायत सदस्य भरत विष्णू काकडे, उद्योजक भीमराव शिंदे, उद्योजक संभाजी राजाराम शिंदे, रामभाऊ शिंदे, संजय ज्ञानोबा शिंदे, शिवाजी लक्ष्मण शिंदे, भगवान शिंदे, महेंद्र शिंदे, प्रकाश काकडे, हरीश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण काकडे, सदाशिव बाळासाहेब काकडे, शामकांत गोसावी, उद्योजक सतीश शिंदे, कैलास काकडे, वैभव शिंदे, स्वप्नील शिंदे, ग्रामपंचायत सदस्या शिवानी शिंदे, उल्का शिंदे, दीपाली शिंदे यांनी नवनिर्वाचित चेअरमन कल्याण आबा शिंदे व व्हा. चेअरमन युवराज काकडे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





