- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवाघमारे वस्तीतील बंद असलेली हायमास्ट सुरू करण्याच्या प्रतीक काळे यांच्या प्रयत्नांना यश...

वाघमारे वस्तीतील बंद असलेली हायमास्ट सुरू करण्याच्या प्रतीक काळे यांच्या प्रयत्नांना यश ; नागरिकांनी मानले प्रशासनाचे आभार

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
पेरणे, ता. हवेली येथील विजय स्तंभाच्या समोरील भागातील प्रभाग क्र. ४ मधील वाघमारे वस्ती परिसरातील बंद पडलेला हायमास्ट लाईट नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होता. रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रतिक संतोष काळे यांनी ग्रामपंचायत पेरणे येथे लेखी अर्ज सादर करून सातत्याने पाठपुरावा केला. सदर अर्जाची दखल घेत ग्रामपंचायतीने अवघ्या पाच तासांत हायमास्ट लाईट दुरुस्त करून पुन्हा सुरू केला. याबद्दल पेरणे ग्रामपंचायतचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या त्वरित कार्यवाहीबद्दल विद्यमान सरपंच उषा दशरथ वाळके, ग्रामसेवक दादाभाऊ नाथ यांनी तातडीने मागणीची दखल घेत या प्रभागातील बंद पडलेला हायमस्ट लाईट तातडीने दुरुस्ती केल्याने या भागातील नागरिकांना रात्रीच्या वेळी होणारा त्रास काही प्रमाणात का होईना कमी झाला आहे. वास्तविक या भागात लहान मुले, महिला तसेच वृद्धांना लाईट बंद असल्याने अनेकदा दबकत रस्त्याने जावे लागत होते. त्यातच काही ठिकाणी पाण्याचे पाईप रस्त्यावर असल्याने वृद्ध घसरून पडण्याची शक्यता होती.


हायमास्ट लाईट सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रात्रीच्या वेळी सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेऊन काम करण्याचा आपला प्रयत्न यापुढेही कायम राहील असे प्रतिक काळे यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page