हवेलीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कंद यांच्या हस्ते वृक्ष देत सत्कार
फुलगाव (प्रतिनिधी): गौतम पाटोळे
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये व पंचायत समिती गणांमध्ये जनतेने विकासाच्या दृष्टीने झेडपी सदस्य व पंचायत समिती सदस्यांना निवडून देत गट, गणांची जबाबदारी देऊन विकासकामे करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आता जनतेच्या विश्वासाला सार्थ ठेऊन जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गणांचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना केले आहे.

पुणे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक रविंद्र नारायण कंद यांच्या हस्ते हवेली तालुक्यातील विजयी झालेले विविध जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा वृक्ष देत सत्कार पार पडला.यावेळी कंद बोलत होते.
यामध्ये पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटाचे सदस्य पै.किरण साकोरे,थेऊर – आव्हाळवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कोमल संदेश आव्हाळे,केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुरेखा रमेश हरगुडे,खेड शिवापूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रुपाली रमेश कोंडे,तसेच लोणीकंद पंचायत समिती गणाच्या सदस्या मोनिका श्रीकांत कंद,पेरणे पंचायत समिती गणाच्या सदस्या राणी दत्तात्रय वाळके, सोरतापवाडी पंचायत समिती गणाचे सदस्य सुदर्शन चौधरी,थेऊर पंचायत समिती गणाचे सदस्य युवराज काकडे, केसनंद पंचायत समिती गणाचे सदस्य कुशाल गोरख सातव आदी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रत्यक्षात भेट घेऊन पुणे,हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक रविंद्र कंद यांच्या हस्ते त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने पार पडला. याप्रसंगी उद्योजक विक्रम गायकवाड, तुळापूरचे माजी सरपंच अमोल शिवले,संदेश आव्हाळे,रमेश हरगुडे,दत्तात्रय वाळके,श्रीकांत कंद,रमेश कोंडे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सत्कार प्रसंगी कंद बोलताना म्हणाले,पुणे,हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जेव्हढी काही मदत,सहकार्य आम्हाला करता येईल तेव्हढे करू. तर शासनाच्या माध्यमातून हवेली तालुक्यातील या गटांच्या व गणाच्या विकासासाठी भरीव निधी मिळवून देण्यासाठी आम्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना साथ देऊ.





