आरोग्य केंद्राच्या वतीने जि.प.सदस्या सुरेखा रमेश हरगुडे व पं.स.सदस्य कुशाल गोरख सातव यांचा सत्कार
वाडेबोल्हाई/पुणे (प्रतिनिधी) : विजय लोखंडे
श्री क्षेत्र वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथे पंचक्रोशीत
मुख्यत्व असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र (सरकारी दवाखाना) येथे केसनंद-वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य कुशाल गोरख सातव यांनी भेट देत या प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती घेत आढावा घेतला.यावेळी ‘पंचायत समिती सदस्य कुशाल सातव हे ॲक्शन मोड’मध्ये आल्याचे पहायला मिळाले.

यावेळी ‘ॲक्शन मोड’मध्ये येत कुशाल सातव यांनी या आरोग्य केंद्राच्या रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती घेतली तर मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती बाबतची पाहणी केली,त्याबरोबर कार्य क्षेत्रातील इतरत्र आरोग्य उपकेंद्रांची माहिती घेतली,यामध्ये सातव यांनी या आरोग्य केंद्रात उभारलेल्या नवीन निवासस्थानांची बांधकामांची पाहणी करून माहिती घेतली.या आरोग्य केंद्र सलग्न असलेल्या उपकेंद्र वाडेगाव,बिवरी,हिंगनगाव,या केंद्रांची नवीन सेवा,सुविधांची व कामांची माहिती वाडेबोल्हाई आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.सचिन सूर्यवंशी यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णाची व्यवस्थित काळजी घेऊन निगा राखली पाहिजेत अशा सूचना कुशाल सातव यांनी उपस्थित आरोग्य अधिकारी यांना दिल्या.तसेच हवेली पंचायत समिती कडून जेव्हढी काही मदत करता येईल तेव्हढी मदत करू असे आश्वासनही सातव यांनी यावेळी दिले.

वाडेबोल्हाई आरोग्य केंद्राच्या वतीने नवनिर्वाचित केसनंद – कोरेगाव मूळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुरेखा रमेश हरगुडे व केसनंद – वाडेबोल्हाई गणाचे पंचायत समिती सदस्य कुशाल गोरख सातव यांचा सत्कार आरोग्य अधिकारी डॉ.सचिन सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश लोहार यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी वाडेबोल्हाईचे माजी उपसरपंच सूरज भोरडे पाटील,माजी उपसरपंच तथा सदस्य सुमित शिंदे, ग्रामविकास अधिकारी संतोष भोसले,आरोग्य सहाय्यक युवराज चव्हाण, औषध निर्माण अधिकारी रश्मी गावडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सुरेखा बछाव,रुग्णवाहिका वाहनचालक संजय फासगे,आदी आरोग्य कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.





